चाकरमानी समाधानी
। पाली । वार्ताहर ।
बोरिवली बस सेवा गेल्या दोन वर्षांपासून बंद होती; परंतु ही बससेवा सुरू व्हावी याकरिता सुधागड रोहा नवगाव मराठा समाजाच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन त्या संदर्भातील निवेदन दिले. दिलेल्या निवेदनाची पालकमंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन पेण एसटी महामंडळ आगाराला दूरध्वनीद्वारा संपर्क करून पाली ते बोरिवली एसटी सेवा सुरू केली. या बसचा येण्या जाण्याची वेळ दुपारी 3:15 वाजता पाली (सुधागड) येथून बोरिवली करीता, तसेच सकाळी 5:45 वाजता बोरिवली येथून पाली (सुधागड) करिता चालू करण्यात आली असल्याची माहिती बसस्थानकातून देण्यात आली आहे. तसेच बसचा मार्ग पाली-नागोठणे-पेण-पनवेल-सायन-अंधेरी-गोरेगाव-बोरिवली असा आहे.
दरम्यान, सुधागड रोहा नवगाव मराठा समाजाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष विनोद पार्टे, कार्याध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक भालचंद्र भनगे, सचिव राजेंद्र उतेकर, उपाध्यक्ष सुभाष सपकाळ, अरविंद वांद्रे, दिलीप उतेकर, विनोद उतेकर, सुनील वांद्रे, सदू उफाले, शरद मोरे, दिलीप कदम, राम पार्टे व समाजाचे सर्व पदाधिकारी बससेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने तालुक्यातील जनतेने त्यांचे आभार मानले आहे.