। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलैपासून जबरदस्त वाढ होत आहे. याच बरोबर, आता केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता थेट 38 टक्के होणार आहे. या वाढीचा फायदा त्यांना पगारातील बम्पर वाढीच्या स्वरुपात दिसेल.
सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली जाऊ शकते. मार्च महिन्यात आलेल्या ऑल इंडिया कंझ्यूमर प्राइस इंडेक्स वरून, जुलै-ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढू शकतो, हे निश्चित झाले आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 च्या एआयसीपी इंडेक्समध्ये घसरण झाली होती. जानेवारी महिन्यात एआयसीपी इंडेक्सचा आकडा 125.1 वर होता. तर, फेब्रुवारी महिन्यात तो 125 वर आला, मात्र, मार्च महिन्यात हा आकडा 1 ने वाढून 126 वर पोहोचला आहे. अद्याप एप्रिल-मे आणि जून महिन्यातील आकडे येणे बाकी आहे. जर हा आकडा 126 च्या वर गेला तर सरकार मडीएफमध्ये 4 टक्क्यांची वाढ करू शकते. जर सरकारने 4 टक्के डीए वाढवला तर केंद्रीय कर्मचार्यांचा डीए 34 टक्के ते 38 टक्क्यांपर्यंत होईल.