घराणेशाही संपवून टाका-मोदी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भ्रष्टाचार, घराणणेशाही संपवायला हवी. त्यासाठी जनतेची साथ हवी आहे. आगामी 25 वर्षांमध्ये भारत हा विकसित देश म्हणून ओळखला जाण्यासाठी संकल्प करण्याचा निर्धार केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचित केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त्त सोमवारी (दि.15) ऐतिहासिक लालकिल्ल्यावरुन देशवासियांना उद्देशून केलेल्या अभिभाषणात मोदींनी अनेक संकल्प मांडले.

समाजात आजही महिलांचा अपमान केला जातो. तो करू नये. महिलांचा सन्मान करायला हवा. मुलगा आणि मुलगी यांना समान वागणून द्यावी, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच देशातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जनतेने साथ द्यावी. ्रष्टाचार्‍यांप्रती जोपर्यंत चीड निर्माण होणार नाही, तोपर्यत देशातील भ्रष्टाचार संपणार नाही. भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी लोकांनी साथ दिली पाहिजे. राजकारण आणि वेगवेगळ्या संस्था यातील घराणेशाहीदेखील संपवली पाहिजे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे आहेत पंचप्राण
पहिला प्राण– भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची आहे.
दुसरा प्राण– गुलामीचा अंश बाहेर काढणे हा आहे. गुलामीपासून मुक्ती मिळवायला हवी. आपल्या मनात गुलामीचा थोडाजरी अंश असेल तर तो काढून टाकला पाहिजे.
तिसरा प्राण – आपल्याला आपल्या वारशाप्रती गर्व असला पाहिजे. कालबाह्य गोष्टींना सोडून नव्या गोष्टी स्वीकारण्याचा आपला वारसा आहे.
चौथा प्राण- एकता आणि एकजुटता होय. 130 कोटी जनतेमध्ये एकता हवी. एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नासाठी एकजुटता गरजेच
पाचवा प्राण– नागरिकांचे कर्तव्य हे आहे, यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचादेखील समावेश आहे. आगामी 25 वर्षातील संकल्प पूर्ण करण्यासाठी ही फार महत्त्वाची प्राणशक्ती आहे.

Exit mobile version