इंधन दरवाढ होताच म्हसळा शहरात पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढले

मोटरसायकल मालकांची चिंता वाढली

म्हसळा | प्रतिनिधी |

देशात पेट्रोलच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली असून म्हसळा शहरात पेट्रोलचे भाव 108.50 पैसांपर्यंत पोहचले आहे.किमती वाढल्यामुळे पेट्रोल चोरी जोमात आहे. यामुळे मोटारसायकल मालकांची चिंता वाढली आहे.

म्हसळा शहरात वाढत्या नागरिकीकरणा सोबत वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे.अनेक इमारती बाहेर उभ्या असणार्‍या मोटरसायकल मधून सर्रास पेट्रोलची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.शहरातील कन्याशाळा परिसर व सावर फाटा येथील नामिया अपार्टमेंट येथे चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे तेथील रहिवास्यांचे म्हणणे आहे.

वाढती महागाई सोबत पेट्रोलच्या किमती देखील झपाट्याने वाढत असताना, पेट्रोल चोरीमुळे आर्थिक नुकसान होत असून पोलिसांनी रतरिची गस्त वाढवून पेट्रोल चोरीवर आळा घालावा अशी मागणी नामिया अपार्टमेंट येथील रहिवास्यांनी केली आहे.

Exit mobile version