मुरुडमधील फरार आरोपींना अटक

। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।

मुरुड पोलीस ठाण्यात काही वर्षांपूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यात अडकलेले दोन आरोपी जामिनावर सुटले होते. परंतु, कोणत्याही कोर्ट केसला हजर न राहिल्याने अखेर न्यायालयाने त्यांना अटक वॉरंटचा आदेश काढला होता. त्याप्रमाणे मुरुड पोलिसांनी या दोन आरोपींना शोधून न्यायालयापुढे हजर करण्याची जबाबदारी घेतली होती.

आरोपी माणिक तानाजी सावंत (53), नशिर नबीलाल सय्यद (40) हे दोन्ही आरोपी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दिवड येथील राहणारे होते. 2005 पासून हे आरोपी मिळत नव्हते यांचा मुरुड पोलीस कसून शोध घेत होते. पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाल्यावर मुरुड पोलिसांनी याना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार सहाय्य्क पोलीस उप निरीक्षक संदीप पडवळ, पोलीस हवालदार खेळू शीद, पोलीस नाईक गणेश डोंगरे यांनी आरोपींच्या परिसरात जाऊन अखेर त्यांना अटक करून आणले आहे. या आरोपींना न्यायालयाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Exit mobile version