| उरण | वार्ताहर|
उरण डाऊरनगर येथील दीपक चव्हाण हत्येप्रकरणातील आरोपी इरफान शेखसह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे.
दीपक हा तरुण बुधवारी गावातील नेहाल या मित्राकडे गेला होता. नेहाल यांच्या घरातून इरफान शेख व त्यांच्या सहकार्यांनी त्याला बाहेर बोलावून घेतले. तेथे दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीतही झाले. त्यात गंभीर जखमी झाल्याने दीपकचा मृत्यू झाला. हत्येनंतर मुख्य आरोपी इरफान शेख हा फरार झाला होता. उरण पोलिसांना आरोपी इरफान शेख यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास चव्हाण अधिक तपास करीत आहेत.