चित्रलेखा ऊर्फ चिऊताई पाटील यांच्या हस्ते लोकापर्ण
| चणेरा | प्रतिनिधी |
शेतकरी कामागर पक्ष दिलेला शब्द पाळतो, याची प्रचिती सोनखार येथील ग्रामस्थांना आली. येथील श्रीराम मंदिराला स्टेन्लेस स्टीलचे ग्रील आणि लाईटसाठी सौरऊर्जा पॅनल बसवून देण्याचे वचन शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी गावकर्यांना दिले होते. त्याचे लोकापर्ण चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि. 16) यांच्या हस्ते करुन वचनपूर्ती करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
एकंदरीतच, चिऊताईंचे विशेष प्रेम असणारी ग्रामपंचायत न्हावे, या ग्रामपंचायतीसाठी त्यांनी रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले, विद्यार्थिनींना एकूण 110 सायकलींचे वाटप केले, गरीब व गरजू लोकांसाठी नेत्रतपासणी करुन मोफत चष्मे वाटप केले, कोरोना काळात अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचे वाटप केले, गरीब व गरजू अपंगांना आर्थिक मदत केली, विद्यार्थी, व्यावसायिक व नोकरदारांसाठी न्हावे-पनवेल एसटी सेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा केला. अशी अनेक कामे चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून याठिकाणी झाली आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गोपीनाथ गंभे, व्हाईस चेअरमन विकास भायतांडेल, कार्यकारिणी चिटणीस संदेश विचारे, कोकबन ग्रामपंचायत सदस्या अरुणा तांबडे, युवक संघटना सचिव अमोल शिंगरे, राज जोशी, शंकर दिवकर, शंकर शाबासकर, पांडुरंग न्हावकर, माजी सरपंच न्हावे राजेश्री शाबासकर, माजी सरपंच वळके किशोर काजारे, विभाग प्रमुख चणेरा शिवसेना (उ.बा.ठा.) मनोज भायतांडेल, सहसंपर्क प्रमुख रोहा तालुका विनायक कटोरे, बिपिन झुरे, माजी कोळी समाज अध्यक्ष सुरेश पोसतांडेल, प्रमोद कासकर, जयश पाटील, युवा कार्यकर्ते महादेव शाबासकर, रवी शाबासकर उपस्थित होते.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, आम्ही हे काम पूर्ण करण्यामागचे कारण म्हणजे येथील कार्यकर्ता सक्षम आहे. आणि, ज्या गावाचा कार्यकर्ता सक्षम त्या गावाचा विकास चांगला. चणेरा विभागात इंग्लिश मीडियमची सुसज्ज शाळा काढायची आहे. त्यामध्ये मुलांचे चांगले भवितव्य घडेल, तसेच एक असा कारखाना आणायचा आहे की, त्याच्यापासून प्रदूषण होणार नाही व त्यापासून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल. यावर्षी आम्ही ताईंच्या सावली अंतर्गत पंचवीस लाख रुपयांचे घरकुल मुरुड, आलिबाग, रोहा मतदारसंघात बांधून दिले. ज्यांना घरकुलाची आवश्यकता आहे, अशा नागरिकांनी आमच्या कार्यकर्त्यांकडून फॉर्म भरुन घ्यावा, जेणे करून पात्र व्यक्तीला घरकुलाचा लाभ घेता येईल, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाव कमिटी अध्यक्ष निळकंठ कासकर, उपाध्यक्ष कैलास भोईर, माजी अध्यक्ष नारायण कासकर, विनायक दिवकर, अवधूत कासकर, विनोद कासकर, ग्रामस्थ, महिलांनी मेहनत घेतली.
न्हावे, नवखार, सोनखार या गावांना मी माझे घर व कुटुंब मानते. तुमचे प्रेमच मला येथे काम करायला प्रेरणा देते. मी हे जे काम केले आहे, ते उपकार नाही तर माझे कर्तव्य मानते. आणि, नुसतं कर्तव्य इंडिया आघाडीच्याच लोकांसाठी नसून, हे कर्तव्य प्रत्येक नागरिकासाठी आहे.
– चित्रलेखा पाटील