घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी निधी जाहीर

| नेरळ | प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणच्या निधीमधून नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पाची पाहणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केली. त्यांनी नेरळ, ममदापुर आणि कोल्हारे ग्रामपंचायतमधील कचर्‍याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हे नियोजन महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, डॉ. पाटील यांच्या समोर या प्रकल्पामधील सर्व मशिन्सची चाचणी प्रत्यशिक देखील घेण्यात आले.

नेरळ आणि ममदापुर या दोन गावांची ग्रामपंचायत असल्यापासून कर्जत-कल्याण रस्त्यावर धरणाच्या खाली कचरा डेपो होता. 25 वर्षापूर्वी नेरळ ग्रामपंचायत मधून ममदापुर गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत बनली. मात्र नेरळ गावाचा कचरा डेपो हलवला गेला नाही, आणि 2021 पर्यंत कचरा डेपो पूर्वीच्या जागेवरच होता. मात्र सतत जाळला जाणारा कचरा आणि त्यातून निघणारा धूर यामुळे नेरळकरांचे आरोग्य धोक्यात आले होते. सतत जाळल्या जाणार्‍या त्याबद्दल कचर्‍याबद्दल सतत प्रसारमाध्यमे यांच्याकडून आवाज उठविला गेला आणि 2021च्या पावसाळयात जिल्हा परिषदेने नेरळच्या जळत्या कचराडेपो बद्दल गांभीर्याने घेतला होता. ग्रामपंचायतीसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारण्यासाठी निर्धार जाहीर करण्यात आला. नेरळ विकास प्राधिकरणकडून ग्रामपंचायतमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यासाठी निधी देण्याचे जाहीर केले.

Exit mobile version