कर्जतमध्ये ग्रामीण भागातील रस्त्यासाठी निधी मंजूर

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याचा मोठा भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये समाविष्ट आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी तब्ब्ल 28 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तालुक्यातील मध्य रेल्वेची मार्गिका आणि कर्जत- नेरळ हा शहरी भाग पूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा भाग होता.दोन वर्षांपूर्वी मुंबई प्राधिकरणचे क्षेत्र विस्तार करताना अर्धा कर्जत तालुका या क्षेत्रात समाविष्ट झाला आहे. त्यानंतर देखील या एमएमआरडीए क्षेत्रातील रस्त्यांच्या आणि पायाभूत सुविधा यांच्यासाठी निधी मिळत नव्हता. त्यात पावसाळा संपला असल्याने खड्डेमय रस्त्यांनी डोके वर काढल्याने अशा रस्त्यांनी प्रवास करणे कठीण होऊन गेले आहे. त्यामुळे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्यातील एमएमआरडीए क्षेत्रातील रस्त्यांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने करीत होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले शिंदे यांनी कर्जत तालुक्याला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version