। चिपळूण । वार्ताहर ।
अतिवृष्टी होऊन होऊन अनेक जिल्ह्यात प्रचंड मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक कुटुंबांना तसेच व्यापार्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते. शासनाने तातडीची मदतही जाहीर केली होती. परंतु आता व्यापारी व नागरिकांना सावरण्यासाठी मोठा निधी जाहीर केला आहे.
राज्यामध्ये चिपळूण शहर व परिसरामध्ये अतिवृष्टीने संपूर्ण शहर उध्वस्त झाले होते यामध्ये चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे नेस्तनाबूत झाली.त्यामुळे व्यापारी वर्ग हतबल व हवालदिल झाला होता.त्यांना दिलासा देण्यासाठी चिपळूण- संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन मदत व पुर्नवसन विभागापासून ते वित्त विभागाकडून हा निधी मंजूर करून घेतला. सदरचा निधी त्वरित वितरीत करण्यात यावा असाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोकण विभागाला यातील एकूण 2825.93 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यासाठी 764.70 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला आला आहे .या निधीमुळे चिपळूण शहर व जिल्ह्यातील अन्य नागरिक व व्यापार्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.