। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लस घेणे खूप गरजेचे आहे. मदत नाही तर कर्तव्य हे ब्रीदवाक्य घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने अलिबागमध्ये मोफत लसीकरण मोहिम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मंगळवारी या मोहिमेच्या तिसर्या टप्प्यास सुरुवात होत आहे. शेकापच्या माध्यमातून दि. 1 ते 8 सप्टेंबर रोजी मोफत लसीकरणाचा पहिला टप्पा व दि. 15 ते 18 सप्टेंबर रोजी दुसर्या टप्पा यशस्वीरित्या पार पडला. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अत्यंत चोख नियोजन केले होते.
तोडकरी रुग्णालयात ही मोहिम राबविण्यात आली. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरीता मोफत बस सुविधाही पुरविण्यात आली होती. ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहिम गावपातळीनुसार सुरु करण्यात आली. योग्य नियोजनासाठी प्रत्येक गावात प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिली. तिसर्या टप्प्यात पहिल्या दिवशी 21 सप्टेंबर रोजी कुर्डुस, कुसुंबळे, ताडवागळे तर 22 सप्टेंबरला ढवर, झालखंड, जांभूळपाडा या गावातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 22 सप्टेंबर रोजी विद्यार्थी आणि युवकांचे लसीकरण करण्यात येईल.
संपर्क प्रतिनिधी-
प्रमोद ठाकूर (कुर्डुस, कुसुंबळे, ताडवागळे)- 9822406688
रचना म्हात्रे (कुर्डुस, कुसुंबळे, ताडवागळे)- 8975459006
मंगेश पाटील (ढवर) – 9422494566
अमोल नाईक (ढवर)- 9850902826
सचिन पाटील (झालखंड, जांभूळपाडा )- 8149198015
पराग पाटील (झालखंड, जांभूळपाडा )-8007512451
विक्रांत वार्डे (विद्यार्थी आणि युवक) -9763751002
साई पाटील (विद्यार्थी आणि युवक)- 8007712870