। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गेल्या आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपाचारावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी होत आहे. पर्वती पायथा निवासस्थानी 8 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभुषण आणि महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यातं आलं होतं. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. कबाबासाहेब पुरंदरेंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पुरंदरेवाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून वैकुंठ स्माशनाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.