मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार

| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मदनदास देवी बंगलोर येथे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी पुण्यात अंत्यविधी करण्यात आले.यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस,अजित पवार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मदनदास देवी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी घर सोडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करण्यास सुरुवात केली होती. संपूर्ण आयुष्य त्यांनी संघासाठी अर्पण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला होता. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मदनदास देवी यांचा सल्ला मानत होते.

Exit mobile version