। मुंबई । वृत्तसंस्था ।
संघर्षातून विश्व उभारणाऱ्या, अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी ४ जानेवारी रोजी पुण्याच्या गॅलेक्सी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 5 जानेवारी रोजी सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव सकाळी 8 वाजता मांजरी येथील बाल निकेतन सदन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार होते. त्यापूर्वी हडपसर मध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार होते. त्यानंतर दुपारी 12 वाजता ठोसर पागेत महानुभाव पंथानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.