जी-20 परिषद उद्यापासून दिल्लीत; झोपड्या झाकल्या

दोन दिवसांसाठी चार हजार कोटींचा खर्च

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

जी-20 परिषदेसाठी जगभरातील अनेक देशांचे नेते भारतात आले आहेत. 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबरला नवी दिल्लीत या नेत्यांची शिखर परिषद पार पडणार आहे. जी-20 शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, या दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी सुमारे 4 हजार 100 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. हा खर्च एकूण 12 प्रकारच्या संस्थांमार्फत करण्यात आला आहे.

‘जी-20 कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींची सुरक्षा व्यवस्था, रस्ते, फूटपाथ, रस्त्यावरील चिन्हे आणि पथदिवे आदिंच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. यामध्ये सुरक्षा व्यवस्थेवर सर्वाधिक खर्च केला. दिल्ली महानगरपालिकांसारख्या नागरी संस्थांपासून ते संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विभागांपर्यंतच्या नऊ सरकारी संस्थांनी हा खर्च केला. परदेशी पाहुण्यांच्या आगमनासाठी सजावट करण्यात आली असून रस्त्यांवर रोषणाई करण्यात आली आहे. लावण्यात आली आहे. शहरातील झोपडपट्ट्या जागतिक नेत्यांना दिसू नये त्या भागात हिरव्या रंगाची शेडनेट लावण्यात आली होती. आता नऊ आणि दहा सप्टेंबरला छतावर येऊ नये, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

परदेशी पाहुण्याच्या खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये खास पक्वानं वाढण्यासाठीची ताटं वाटीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या ताटवाट्यांमध्ये जेवण वाढलं जाणार आहे. यामध्ये त्यांना भारतीय संस्कृतीचं आणि वारश्याचं दर्शन घडणार आहे. जी-20 परिषदेत जगभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहेत. त्यांच्या ऐवजी त्यांच्या देशाचे प्रतिनिधी सामील होतील. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली की कोणत्या देशाचा नेता येत नाहीये याने काही फरक पडत नाही. त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीला देशांची बाजू मांडता आली पाहिजे.

Exit mobile version