जी. एम वेदक कॉलेजचे विविध स्पर्धेत यश

| तळा । वार्ताहर ।

महाविद्यालय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेत जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा-रायगडमधील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून कॉलेजच्या लौकिकात भर घातली आहे. या निमित्ताने यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान महाविद्यालय तर्फे करण्यात आला. आंतर महाविद्यालयीन मुष्टियुद्ध स्पर्धा मध्ये कुमार रोषण मोहिते यांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तर कु. प्रार्थना बेटकर हिने वक्तूत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच सौरभ जोगडे याने उड्डाण महोत्सव मध्ये पोस्टर मध्ये उत्तेजनार्थ व गणेश कदम आणि व त्यांच्या सहकारी यांनी उड्डाण महोत्सव मध्ये तृतीय क्रमांक मिळविले आहे. या सर्व विजेत्यांचे संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाविद्यालयीन विकास समितीचे ज्येष्ट सदस्य पूरूषोतम मुळे प्रा. डॉ विजय सरोदे, नंदकुमार वेदक, उन्मेष वेदक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. बी. जी. भवरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पी बी. अभंगे यांनी उत्तम प्रकारे केले आहे.

Exit mobile version