| तळे । वार्ताहर ।
तळे येथील जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे दिनांक 23 जानेवारी स्वातंत्र्य सेनानी स्व. प्रभाकर रामकृष्ण देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ नवीन शैक्षणिक धोरण साधक की बाधक या विषयावर वाद विवाद स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत श्वेता विश्वकर्मा व शिवम सुतार यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच स्व. प्रभाकर महादेव जोशी आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचा विषय भारतीय अमृत महोत्सव भारतीय राष्ट्रीय उभारणी-माझे आकलन असा होता. यामध्ये प्रार्थना बेटकर हिने प्रथम क्रमांक मिळविला असून तिला फिरता चषक,सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी मारुती शिर्के, चंद्रकांत रोडे, पुरुषोत्तम मुळे, महेंद्र कजबजे, अँड सुनील कुलकर्णी, महादेव बैकर, प्र. प्रा. डॉ. भगवान लोखंडे, डॉ. नानासाहेब यादव, डॉ. दिवाकर डॉ. तृप्ती थोरात, डॉ. थोरात, डॉ. गायकवाड, डॉ. दत्ता कुंटेवाड यांचे सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.