तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गायकवाड

| तळा | वार्ताहर |

शेणवली ग्रामपंचायतीची ग्रामसभा खांबवली मुळगाव हनुमान मंदिर येथे प्रशासकीय अधिकारी पुष्पा नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी शेणवली येथील आदेश जनार्दन गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामसभेप्रसंगी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे, माजी सरपंच खेळू वाजे, राजाराम गायकवाड, वंदना गायकवाड, उपसरपंच गंगाराम भोरावकर, धनराज गायकवाड, माजी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष मनोहर गायकवाड, पोलीस पाटील नारायण गायकवाड यांसह ग्रामपंचायत हद्दीतील सहा गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version