। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील नावडे गावामध्ये गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्य व समाजामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवण्याचं काम करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी विलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी भीमराव निवृत्ती कांबळे, सचिव सुरेश शिंदे, सहसचिव प्रमोद राजहंस, खजिनदार गोरख अहिरे, सह खजिनदार धर्मेंद्र अहिरे, सल्लागार तानाजी लोखंडे, राजाराम कांबळे, आजिनाथ बनसोडे , रवींद्र मोरे, संघटक सचिन गायकवाड, महिला संघटकपदी नेहा ताई शिंदे, सभासद सविता गायकवाड, नंदाताई कांबळे, चंद्रकांत नरवाडे अनिल खैरे, डॉ अपर्णा गायकवाड व हिशोब तपासणीक पदी संजय गायकवाड यांची निवड करण्यात आली.