खानाव परिसरात विकासांची गंगा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
उसर येथील गेल (इंडिया) कंपनीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून खानाव परिसरात विकास कामांचा झपाटा सुरू करण्यात आला आहे. पेव्हर ब्लॉकचे रस्ते, उसर येथील प्राथमिक शाळा सुशोभीकरण, उसर, मुळखानाव, कुणे, वेलवली, भेरसे, वेलतवाडी, भादाणे व वनवली या गावांमध्ये सौर उर्जेवर आधारित पाणीपुरवठा करण्यासाठी सोलार पॅनल बसविण्यात आले आहे. या कामांचा उद्घाटन समारंभ कंपनीचे कार्यकारी निदेशक तथा प्रभारी अधिकारी अनूप गुप्ता यांच्या हस्ते शुभ हस्ते करण्यात आला.
यावेळी गेल (इंडिया) लिमिटेड, उसर कंपनीचे मानव संसाधन विभागाचे महाप्रबंधक जितिन सक्सेना अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायतीचे सदस्य, वेलवली व आसपासचे गावांतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
गेल (इंडिया) लिमिटेड कंपनी आपल्या कॉर्पोरेट पर्यावरण दायित्वाच्या (सीईआर) अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे नेहमी शाश्वत विकासाला चालना देते. अशाप्राकरे गेल (इंडिया) लिमिटेड कंपनीने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उसर येथे प्रोपेन डिहायड्रोजेनेशन पॉलीप्रोपायलीन (पीडीएच-पीपी) प्रकल्पांतर्गत प्रकल्पाच्या परिसरातील आसपासचे गावांच्या विकासासाठी कॉर्पोरेट पर्यावरण दायित्वाच्या (सीईआर) अंतर्गत अनेक सार्वजनिक विकासात्मक कामे हाती घेतली आहेत. सीईआर योजनेचे अंतर्गत करण्यात येणारी कामे परिसरातील स्थानिक ग्रामपंचायतींच्याद्वारे आणि रायगड जिल्हा परिषदेचे नियंत्रणामार्फत केली जात आहेत. ज्यामध्ये पिण्याचे पाण्यासाठी आरओ प्लांटची व्यवस्था,पाणी साठवणुकीच्या टाक्या, सौरपथ दिवे, शाळा – आंगणवाड्यांचे सुशोभिकरण आणि डिजिटलाझेशन, तलावाचे बांधकाम, बस स्टॉपचे बांधकाम, उंच प्रकाशस्तंभ असलेली लाईट, इत्यादी पायाभूत सुविधांचा समावेश असल्यामुळे अशा विकास कामांचा लाभ संबंधित गावांत राहत असणाऱ्या तळागाळातील सर्व लोकांना निरंतरपणे मिळावा असा गेल कंपनीचा मुख्य उद्देश आहे. गेल कंपनीचे सीईआर योजनेचे अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या आदेशानुसार गेल – उसर प्रकल्पाच्या परिसरातील ग्रामपंचायती वअन्य संस्थांमार्फत आजपर्यंत रु.14.02 कोटींची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी आजपर्यंत रु.3.73 कोटींची कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित सार्वजनिक विकासात्मक कामे चालू असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही चालू आहे.
सद्यस्थितीत खानाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेल कंपनीचे सीईआर फंडातून पेव्हर ब्लॉक रस्त्यांसाठी 35 लाख रुपये, प्राथामिक शाळा, उसरच्या सुशोभिकरणासाठी 10 लाख रुपये, आणि उसर, मुळखानाव, कुणे,वेलवली,भेरसे, वेलतवाडी, भादाणे व वनवली या गावांमध्ये सौर उर्जेवर आधारित पाणीपुरवठा करणेसाठी सोलार पॅनलकरिताएकूण 40 लाख रुये इतक्या रकमेची कामे पूर्ण झालेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उसर, मुळखानाव, कुणे, वेलवली, भेरसे, वेलतवाडी, भादाणे व वनवली या गावांमध्ये सौर उर्जेवर आधारित पाणीपुरवठा करण्यासाठी सोलर पॅनलचे उद्धाटन मंगळवारी (दि.9) गेल (इंडिया) लिमिटेड, उसर कंपनीचे कार्यकारी निदेशक तथा प्रभारी अधिकारीअनूप गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गेल कंपनीचे कार्यकारी निदेशक अनूप गुप्ता यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करतांना सांगितले की वर्ष 2023 पासून आजपर्यंत ग्रुप ग्रामपंचायत, खानाव यांचे हद्दीत येणाऱ्या गावांकरिता गेल कंपनीचे सीईआर फंडातून 2.92 कोटीं रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. खानाव ग्रामपंचायती करिता इतक्या रकमेची विकास कामे मंजूर करुन सुद्धा अद्यापपर्यंत रु.1.44 कोटींची कामे खानाव ग्रामपंचायतीने केलेली नाहीत, अशी खंत व्यक्त करीत गेल कंपनीने मंजूर केलेल्या विकास कामांपैकी62 लाख रुपयांची विकास कामे न करण्याबाबत खानाव ग्रामपंचायतीनेलेखी पत्राद्वारे गेल कंपनीस कळविण्यात आले आहे. अशाप्रकारे गेल कंपनीचे कार्यकारी निदेशक महोदयने उपस्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांना विनंतीपूर्वक सांगितले की आपले परिसरात इतका मोठा प्रकल्प आल्यामुळे सीईआर फंडाचा जास्तीत जास्त लाभ खानाव ग्रामपंचायतीस मिळाला पाहिजे. त्यामुळे खानाव ग्रामपंचायतीकडे मंजूर सीईआर फंडातील बाकी असलेली कामे निर्धारित वेळेचे आगोदर लवकरात लवकर पूर्ण करून नविन विकास कामांचे प्रस्ताव गेल कंपीनकडे पाठविले पाहिजेत.







