गंभीरला प्रशिक्षकपदाची ऑफर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

राहुल द्रविडनंतर भारतीय संघाला शिकवणी देण्यासाठी प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागितले आहेत. न्यूझीलंडचा दिग्गज स्टिफन प्लेमिंग आणि रिकी पाँटिंग यांना दावेदार मानले जात आहे. पण आता या स्पर्धेत गौतम गंभीर असल्याचेही समोर आले आहे. एका रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयकडून गौतम गंभीरला भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी ऑफर देण्यात आली आहे. पण गौतम गंभीर ही ऑफर स्वीकारणार का, हे पाहावे लागेल. राहुल द्रविडचा कार्यकाळ टी-20 विश्वचषकानंतर संपुष्टात येत आहे. राहुल द्रविडने थांबायचे ठरवले आहे, व्हीव्हीएस लक्ष्मणनेही अर्ज करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय संघावचा नवा प्रशिक्षक कोण, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 1 जुलैपासून भारतीय संघाला नवील कोच मिळणार आहे. बीसीसीआयची मागणी गौतम गंभीर मान्य करणार का, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Exit mobile version