| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. शिखर धवनची निवड करून त्याला कर्णधार बनवता येईल, असे यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात होते, पण तसे झाले नाही. धवनला डच्चू देत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत टी-20 स्वरूपात होणार आहे.
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा हे स्टार खेळाडूही भारतीय संघात आहेत. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती.
भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), राखीव खेळाडू : यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.