| पनवेल | प्रतिनिधी |
सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचे अड्डा चालवणाऱ्या, कामोठे मधील विनम्र वेलफेयर सोशल क्लब वर धाड मारून नवी मुबई पोलिसांच्या पथकाने जुगाराचा अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत घटनास्थळा वरून पोलिसांनी जुगार खेळत बसलेल्या 15 व्यक्तींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच काही रोख रक्कम देखील घटनास्थळा वरून जप्त केली आहे. या कारवाई मुळे सोशल क्लब मधील काळे धंदे पुन्हा उघड झाले आहेत.
कामोठे सेक्टर 12 मधील पुष्प संगम बिल्डींग मध्ये विनम्र वेलफेयर सोशल क्लब च्या नावा खाली जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती, नवी मुबई पोलिसांच्या पथकातील मध्यवर्ती गुन्हे शाखा याना लागली होती, या मिळलेल्या माहिती नुसार स्थानिक कामोठे पोलिसांच्या मदतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, तसेच मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक तुगेनवर अलका पाटील आणि अन्य पोलिसांच्या पथकाने विनम्र वेलफेयर सोशल क्लब कामोठे वर धाड मारली.
त्यावेळी, क्लबमध्ये जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असता काही सदस्य हे क्लबचे मेंबर असल्याचे दिसून आले. मात्र काही मेंबर हे केवळ जुगार खेळण्यासाठी आले असल्याचे समोर आले आहे. यावेळी जवळपास 15 ते 20 व्यक्ती पोलिसांना क्लबमध्ये दिसून आले. जुगार खेळण्यासाठी आलेल्या व्यक्तीची आणि क्लबची अधिक तपासणी केली असता, पोलीस पथकांना काही रोख रक्कम देखील मिळून आली आहे. जवळपास 14 हजार 150 रुपयांची रोख रक्कम पोलिसांना मिळून आली आहे. तसेच टेबल क्रमांक लिहिलेले रजिस्टर प्लास्टिक कॉइन असा मुद्देमाल पोलिसाना मिळून आला आहे. सोशल क्लब च्या नावाखाली हे उउद्योग केले जात असल्याचे समोर आले आहे.