उपाध्यक्ष पदावर संतोष वैखरे बिनविरोध
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील वाकस येथील आदिवासी विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष पदावर शेतकरी कामगार पक्षाचे गणेश शांताराम पवार यांची तर उपाध्यक्ष म्हणून संतोष वैखरे यांची बिनविरोध निवड झाली.
वाकस येथील आदिवासी विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी मंगळवारी (दि.29) निवडणूक घेण्यात आली. त्यात पीठासीन अधिकारी म्हणून ए.ए.मदने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी गणेश शांताराम पवार यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी संतोष दशरथ वैखरे यांनी अर्ज दाखल केले होते.दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाले होते आणि त्यामुळे अध्यक्ष म्हणून पवार तर उपाध्यक्ष म्हणून वैखरे यांची बिनविरोध निवड झाली. त्या विशेष सभेला सदस्य अनंता वाघमारे, वसंत निर्गुडा, सुरेश भोसले, रमेश वाघमारे, शांताराम पवार, मनोहर भागीत, निराबाई पेमारे, वंदना मोरे, कृष्णकांत कदम, बबन धुळे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी शेकापचे प्रभारी तालुका चिटणीस आणि पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार श्रीराम राणे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र हजारे, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनंता दळवी, माजी उपसभापती विठ्ठल भुंडेरे, रोशन दळवी, विलास भागीत, सुनील भागीत, नितीन धुळे,आदी उपस्थित होते.