। श्रीवर्धन । वार्ताहर ।
रायगडमधील सर्व नगर परिषद व नगर पंचायती मधील सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची नुकतीच रोहा येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 2 मे पासूनचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने भेडसावणार्या अनेक महत्वाच्या प्रश्नांवर उपस्थित सर्व प्रतिनिधींनी आपली मते मांडली अशी माहिती म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व राज्य कमिटीचे निमंत्रक अॅड.सुरेश ठाकूर यांनी दिली.
या बैठकीत शासकीय कर्मचारी, नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी यांना सातत्याने जी सावत्रपणाची वागणूक दिली जाते त्याबद्दल मोठे आंदोलन ोणे आवश्यक आहे असे मत मांडण्यात आले. या बैठकीत अॅड.सुरेश ठाकूर, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल
जाधव यांनी कामगार संघटनांचे महत्व, कार्याची पद्धत कशी असणे गरजेचे आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बैठकीत कामगारांची रायगड जिल्ह्याची कार्यकारि णीही तयार करण्यात आली. बैठकीतील निर्णयानुसार दि.2 मे पासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतींचे कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत.