। माणगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या माणगाव प्रीमिअर लीग 2021 च्या पहिल्या पर्वाची क्रिकेट स्पर्धा दि.4 ते 7 डिसेंबर दरम्यान निळगुण फाटा येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत हरेश गजमल व राकेश वाढवळ संघमालक असणार्या गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाने चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अल्ताफ धनसे, तौसिफ़ राऊत, निसार जालगावकर संघमालक असणार्या रॅपीडो मोर्बा संघाचा पराभव करून प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस रुपये 55 हजार 555 व आकर्षक चषक पटकाविला. या स्पर्धेत माणगाव तालुक्यातील 16 संघानी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील उपविजेते रॅपीडो मोर्बा संघास रोख रुपये 33 हजार 333 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते संघमालक निलेश केसरकर यांच्या के. सरकार लोणेरे संघास रोख रुपये 22 हजार 222 व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाचे विजेते संघमालक जितेंद्र तेटगुरे यांच्या सुमन मॉटल्स मांगवली संघास रोख रुपये 22 हजार 222 व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक बक्षिसांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सुरज म्हस्कर यांस एल.इ.डी टीव्ही व चषक, उत्कृष्ट गोलंदाज केतन भोस्तेकर यांस एल.इ.डी टीव्ही व चषक, सामनावीर शैलेश पवार यांस आकर्षक चषक तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मसऊद गजगे यांस सायकल बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
चार दिवस चाललेल्या या स्पर्धेचा क्रिकेट शौकिनांनी मनमुराद आनंद घेतला. या स्पर्धा यशस्वीरीत्या व उत्साहात पार पाडण्यासाठी माणगाव प्रीमिअर लीगचे अध्यक्ष मंगू जाधव, सल्लागार विश्वास उभारे, भाई दसवते, वैभव टेंबे, उपाध्यक्ष नंदुराज वाढवळ, निलेश केसरकर, रिहान मुल्ला, खजिनदार राहुल बक्कम, सागर पाशिलकर, महेश पोवार, रशीद खेरटकर, सेक्रेटरी रोहित रातवडकर, समीर महाडिक, सदस्य फहद कर्बेलकर, मुकुल मेहता, सुनील खडतर, सूचन कदम, निसार जलगावकर, संकेत कदम, निलेश उभारे, केदार जाधव, मोहसीन नदाफ, तौसिफ़ राऊत आदींसह प्रीमिअर लीगच्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.