| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरात अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने रस्त्यावर पूर्णतः काळोख पडल्याने गणेशभक्तांनी नाराजी दर्शवली आहे. गौरी गणपती विसर्जनकरिता मुरुड शहरातील शेकडो गणपती विसर्जनाकरिता हातगाडीवरून निघत असतात. परंतु, संध्याकाळच्या दरम्यान वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने अनेक गणेशभक्तांची तारांबळ उडाली. गणेशभक्तांनी आपल्या गणपतीवर काळोख पडत असल्याने मोबाईलच्या टॉर्चवरुन, कोणी जनरेटर लावून गणपती बाप्पा विसर्जनासाठी समुद्रकिनारी आणण्यात आले. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे.