21 दिवसांनी गणरायाला निरोप

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड पोलीस ठाणे हद्दीतील 21 दिवसांच्या गणपती बाप्पाला ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. यावेळी समुद्रकिनाऱ्यापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी करत नाचत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

21 दिवसांचे मुरूड शहरात 4 तर ग्रामीण भागात 11 घरगुती गणपती बाप्पा विराजमान झाले होते. मंगळवारी गणरायाला 21 दिवस पूर्ण झाल्याने रात्रीच्या वेळी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसळे, पोलीस शिपाई व महिला पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Exit mobile version