उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार व हत्या

सीबीआय चौकशीची कुटुंबीयांची मागणी
पोलिसांनी 35 जणांना घेतलं ताब्यात
। उत्तरप्रदेश । वृत्तसंस्था ।
चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये एका 16 वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत 35 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. तसेच 10 जणांची कसून चौकशी केली जात आहे. त्याशिवाय पोलिसांचे 12 पथक मुख्य आरोपी शोध घेत आहेत. बरेलीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा म्हणाले, की या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच यासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल.
या घटनेनंतर योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं असून आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. समाजवादी पार्टीने पीडितेला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी कँडल मार्च काढला होता. दरम्यान चार दिवस उलटूनही आरोपींचा शोध घेण्यात यश आलं नसल्यानं पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री जफर अली नक्वी यांनी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. प्रियंका गांधींच्या सांगण्यानुसार नक्वी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Exit mobile version