17 वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार; आरोपी अटकेत

| नालासोपारा | वृत्तसंस्था |

बदलापुरची घटना ताजी असतानाच नालासोपार्‍यात 17 वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी 17 वर्षीय पिडीत मुलीची एक मैत्रीण नालासोपार्‍यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपार्‍याला जात होती. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्‍या तरुणाची व तिची केवळ 4-5 दिवसांची ओखळ होती. गुरुवारी (दि.22) सोनू नामक (2) तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. तिला फिरण्याच्या बहाण्याने बोलावून नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी नेले. आरोपी सोबत त्याचा मित्र देखील होता. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्‍यानंतर मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांनी पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Exit mobile version