दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार; चार जणांना अटक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पीडित महिला आणि आरोपींमध्ये वैमनस्य होते, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे केस कापले, तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वैयक्तिक वैमनस्यातून एका महिलेवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना शाहदरा जिल्ह्यात घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version