पुण्यात तरुणीवर सामूहिक अत्याचार

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्याजवळील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर गुरुवारी (दि. 3) रात्री सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी राजेखा करीम पठाण याच्यासह तिघांना अटक केली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमध्ये बसवून कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून आरोपी नराधम पसार झाले. त्यानंतर तरुणीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.

Exit mobile version