| नवी मुंबई | प्रतिनीधी |
एपीएमसीतील दाणा मार्केटमध्ये गांजाची विक्री करणार्या शाहरूख अब्दुल शेख (30) याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दाणा मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. 5) रात्री झालेल्या या कारवाईत पोलिसांनी 20 हजार रुपये किमतीचा एक किलो 50 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा त्याने कुठून आणला, याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त करत त्याने तो कुठून आणला, याबाबत चौकशी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी शाहरूखविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.







