खोपोलीत गांजा विक्री करणारी टोळी गजाआड

2 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहरातील मुळगाव या भागात गांजा विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असल्याने 25 मार्च रोजी मुळगावत हनुमान मंदिर परिसरात साफला रचून कार मध्ये गांजा चा साठा व या कामासाठी वापरण्यात येणारी कार असा एकूण 2 लाख 76 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपी ला अटक करण्यात आली आहे.

खोपोली शहरात गांजा विक्री करण्यासाठी टोळी कार्यरत असल्याची गुप्त माहिती 25 मार्च रोजी स.पो.नि पवनकुमार ठाकूर, पो. हवा पाटील, पो हवा खैरनार, पो हवा दबडे, पो हवा हंबीर,चालक स.फौ. कोरम ही टीम गस्ती वर असताना पो ह राजेश पाटील यांना गांजा विक्रीची मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली त्यामुळे या पथकाने मुळगाव खोपोली गावच्या हद्दीत खोपोली हनुमान मंदिर या ठिकाणी छापा टाकला आणि आरोपी हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला, वय 32 वर्ष, रा. अशियाना बिल्डिंग, 4था माळा , फ्लॅट नंबर 401, खोपोली बाजार पेठ, तालुका खालापूर, जिल्हा रायगड यास त्याच्या ताब्यातील एका वॅगनर कार क्र. एम एच 01/BF/0282 मध्ये 6 किलो .394 किलो ग्राम वजनाचा एकूण 76,700/- रु.कींचा मादक अमली पदार्थ गांजा जप्त केला असून या कामासाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण 2,76,700/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . आणि हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला, वय 32 वर्ष, रा.अशियाना बिल्डिंग, 4था माळा, फ्लॅट नंबर 401, खोपोली बाजार पेठ यांना अटक करण्यात आले आहे सदर बाबत आरोपीत याच्याविरुद्ध खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 80/2022 एन डी पी एस कायदा कलम 8 क वगैरे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version