गणराज बाणकोटकर बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुका पावसाळी स्पर्धेत बुद्धिबळ स्पर्धा साळाव जिंदाल हायस्कूल येथे घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव हायस्कूल येथे शिकत असलेला गणराज हरिदास बाणकोटकर याने 19 व्या वयोगटात मुरुड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गणराज याने प्रत्येक राऊंडमध्ये आघाडी घेत मोठा विजय प्राप्त केला. कोणतेही बुद्धिबळाचे प्रशिक्षण नसताना केवळ घरात सराव करून त्याने हा मोठा विजय संपादन केला. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 17 वर्ष वयोगटात आर्या पाटील हिने बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच नुपूर जमनु याने 14 वर्ष वयोगटात तिसरा क्रमांक पटकावला आहे. स्वराज वाडकर याने 17 वर्ष वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला आहे. सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version