समाजवादी पक्ष आघाडीतून बाहेर
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल उरण तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात एकत्रित येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप आणि समाजवादी पक्ष यांनी विविध आंदोलने एकत्र केली. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमनतळाला दि.बा. पाटील यांच्या नामकरणाचा विषय हा यापैकी एक असून, स्थानिक पातळीवर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीतून समाजवादी पक्ष बाहेर पडला आहे.
पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांनी याबाबत पत्रक काढून ही माहिती दिली आहे. स्थानिक पातळीवरील विविध निवडणुकादेखील समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याची माहिती यावेळी अनिल नाईक यांनी दिली. राज्यात सत्ताबदल झाल्याने महाविकास आघाडीत फूट पडताना दिसून येत आहे.
पनवेल, उरणमध्ये ‘मविआ’त फूट
