प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली श्रुती शिर्के
| पनवेल । वार्ताहर ।
करंजाडे येथील सेक्टर येथील मैदानावर आयोजित केलेला शेकाप पुरस्कृत गरबा दांडिया 2022 ची सांगतात दसर्याला करण्यात आली. गेल्या नऊ दिवस उत्साहामध्ये गरबा साजरा करण्यात आला. महिलांनी दांडीया खेळण्याचा आनंद घेतला. यामध्ये पनवेल येथील श्रुती शिर्के ही पहिल्यांदा मानाची मानकरी ठरली. यावेळी उपस्तित असलेले माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, ममता प्रीतम म्हात्रे, तसेच सरपंच रामेश्वर आंग्रे, मंगेश बोरकर तसेच मित्रमंडळ यांच्या उपस्तित शिर्के हिला स्कूटी दुचाकी देण्यात आली.
गरबा आणि दांडिया प्रेमी नवरात्रोत्सवाची अतुरतेने वाट पाहत असतात. नृत्याचा आनंद घेण्यासाठी तरूणाईसह महिलांना अधिक आवड आहे. दांडिया नृत्य करण्यासाठी मोठ्या जागेची गरज लागते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही प्रस्त्यक्षात भेट देत करंजाडेकरांना नवरात्रोत्सव व दसर्याच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या नऊ दिवस दांडीया नृत्याची हौस पूर्ण करण्यासाठी तरूण – तरूणी मोठ्यासंख्येने उपस्तित होते. रोजच्या रोज सुमारे पाचशे ते एक हजार नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत होते. यामध्ये प्रथम क्रमांक श्रुती शिर्के, दुसरा क्रमांक प्रणय चौधरी, तसेच तिसर्या क्रमांकाचा मानकरी म्हणून ऋषी कइनाकर ठरला.