| अलिबाग | प्रतिनिधी |
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत आम्ही अलिबागच्या उद्योगिनीतर्फे खास महिलांसाठी ‘गरबा रमजो रे’ हा कार्यक्रम गुरुवारी 29 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे.
भाग्यलक्ष्मी हॉल येथे होणार्या या कार्यक्रमास सायंकाळी 4 ते 6 फॅन्सी ड्रेस स्पर्धा, संध्याकाळी 6 ते 7 महाभोंडला, रात्री 7 ते 10 गरबा नृत्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या गरबा नृत्यामधून अलिबाग गरबा क्वीन, बेस्ट गरबा जोडी, बेस्ट गरबा त्रिकूट, बेस्ट गरबा ग्रुप असे निवडले जाणार आहेत. यासाठी प्रवेश फी 350 अशी आकारली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पुजा काठे ( 8007066888), कविता पाटील( 9271006900), आशा बोराडे( 7718890262), समिधा चांदोरकर( 9422495096) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे पास देवश्री साडीज, मारुती नाका, मल्हार मिसळ, बायपास रोड, सिंगींग स्टार कराओके स्टुडिओज, ईझी शॉपी, अलिबाग येथे उपलब्ध होणार आहेत.