नगरपरिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील दहीवली परिसरात कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. याकडे कर्जत नगरपरिषदेचे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे. अशी पोस्ट नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी सोशल मीडियावर टाकून नगरपरिषदेसह कर्जतकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कर्जत मधील कोंढणे टाईम्स या व्हॉट्सआप ग्रुपवर माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी दहीवली परिसरातील असणार्या पुलाखालील नाल्याचे रूपांतर कचराकुंडीमध्ये झाले आहे. तसेच रस्त्याच्या साईडपट्टीचे गवत साफ नाही, नीट गटारे साफसफाई करत नाही, कोणी याबाबत ठोस पाऊले उचलतील का? कर्जत नगरपरिषदेचे स्वछता विभाग या सार्या भयानक गोष्टींकडे लक्ष देईल का? असा प्रश्न सोशल मिडीयाद्वारे त्यांनी उपस्थित केला आहे.






