। चिपळूण । प्रतिनिधी ।
स्वच्छ व सुंदर सावर्डे या ध्येयाने प्रेरित होऊन सावर्डे ग्राम आरोग्य पाणीपुरवठा स्वच्छता समितीतर्फे सावर्डे परिसरातील ग्रामस्थांना डस्टबिन वापरण्याची सवय व्हावी व सामाजिक ठिकाणी परिसर स्वच्छ व सुंदर राहावा या उद्देशाने डस्टबिनचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य पूजा निकम, सावर्डेच्या सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, माजी सरपंच सुभाष मोहीरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप खेराडे, समीया मोडक, सुप्रिया सावंत, प्रमिला वरवाटकर, सुनील जाधव, सावर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक रफिक मोडक, ग्रामस्थ, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.