| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
कामोठे वसाहती मधील रस्त्यावर पालिकेची कचरा उचलणारी गाडी खचल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकारामुळे वसाहती मधील रस्त्याच्या करण्यात आलेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असून, डांबरी करणाच्या नावावर दर्जाहीन रस्ते बनवण्याचे काम पालिकेकडून करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केला आहे. वसाहती मधील सेक्टर 18 येथील सिल्वरस्टार सोसायटी समोर रस्त्यावर पालिकेची कचरा वाहून नेणारी गाडी खचली. पनवेल पालिकेच्या माध्यमातून कामोठे वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे आणि डांबरी करणाचे काम करण्यात आले आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने प्रशासनाच्या कामा बाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच घडलेल्या या प्रकारावर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्यात खचली कचरा गाडी
