पालिका उभारणार चार स्टेशन्स
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका प्रशासनाकडून इलेक्ट्रिक वाहना करिता चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्टेशन उभारणी करता पालिकेकडून जागा निश्चित करण्यात आल्या असून, पालिकेच्या चार प्रभागातील चार ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी कंपनीची नेमणूक करण्यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. इधणांच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायला पसंती देत आहेत.
इलेक्ट्रिक वाहणाच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होणार असल्याने शासन देखील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत असून, वाहन चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याला प्राथमिकता देत आहे. पनवेल पालिकेने देखील पालिका हद्दीत चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या करिता जागा निश्चित करण्यात आल्या असून, प्रभाग अ मधील हिरानंदाणी सर्कल येथील भूखंड, प्रभाग ब मधील शिव पनवेल महामंर्गावरील कामोठे उड्डाणं पुला शेजारील कळंबोली वसाहती मधील भूखंड, प्रभाग क मधील कामोठे वसाहती मधील सेक्टर 19 मधील भूखंड तसेच प्रभाग ड मधील वडाळे तलावा शेजारील भूखंड निश्चित करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
नऊ वर्षासाठी भूखंड
पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निविदे नुसार चार्जिंग चार्जिंग स्टेशन उभारण्या साठी पालिका उपलब्ध करून देणार असलेले भूखंड 9 वर्षाच्या करारावर देण्यात येणार आहेत. या करिता पालिका कोणताही मोबदला घेणार नाही. चार्जिंग स्टेशन उभरण्याचा खर्च संबंधित कंपनीला करावा लागणार असून,इलेक्ट्रिक वाहन चालकांकडून नाममात्र दर कंपनीला आकारता येणार आहे. दोन चार चाकी आणि एक दुचाकी होणार चार्ज दोन चार चाकी आणि 1 दुचाकी एक साथ उभ्या करून चार्जिंग करता येतील या आकारातील भूखंड पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.