| म्हसळा | वार्ताहर |
कुडेकर इंटरनॅशनल स्कूल, म्हसळा या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास नगरसेविका राखी करंबे, नगरसेवक मुन्ना पानसरे, सुरेश कुडेकर, संस्कृती सुरेश कुडेकर, संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका शाहीन अन्वर गजगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अजय करंबे, आदित्य जोशी, संतोष कुडेकर, विशाल साळुंखे, संतोष उद्धरकर, प्रसाद बोर्ले, बाबू शिर्के, अमोल पेंढारी, अमित म्हामुणकर आणि पालक वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलात बालकलाकारांनी आपल्या नृत्य कलेतून मान्यवरांचे आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिपूरकर इंग्लिश स्कूल येथे जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा पार पडली. या स्पध्यमध्ये कुडेकर इंटरनॅशनल स्कूलचे 20 विद्यार्थी स्पर्धेस सहभागी झाले होते. त्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सिनियर के.जी. मधील शर्वरी शरद कोद्रे हिने सुवर्ण पदक मिळवून प्रथम क्रमांक पटकावला