राजेंद्रशेठ खारपाटील यांचे प्रतिपादन
| चिरनेर | वार्ताहर |
समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्य करणारे परशुराम (आबा) खारपाटील व काळूशेठ खारपाटील यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यांचे विचार, शिकवण, आदर्श हीच यशाची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील यांनी केले. पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे वार्षिक स्नेहसंमेलन सुरू झाले असून या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात राजेंद्रशेठ खारपाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगपती तथा संस्थापक अध्यक्ष पी.पी. खारपाटील व उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर रा.जि.प.चे सदस्य बाजीराव परदेशी, संतोष ठाकूर, शुभांगी पाटील, शेकापचे सुरेश पाटील, उद्योगपती सागर खारपाटील, बी.पी. म्हात्रे, संतोष ठाकूर ,रमेश फोफेरकर, आर.एन. पाटील ,अर्चना ठाकूर, वर्षा खारपाटील ,सुनिता खारपाटील, उद्योगपती समीर खारपाटील, सूरदास राऊत, अलंकार परदेशी, गजानन चौलकर, एस.एस .पाटील,आनंद चिर्लेकर, स्मिता मसुरकर, सुप्रिया म्हात्रे, मंदा घरत, सचिन घबाडी, घनश्याम पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सूरदास राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मंथना ठाकूर यांनी केले. अहवाल वाचन मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे. व श्रद्धा भोईर यांनी केले. आभार अनिल पाटील यांनी मानले.वद्यार्थी प्रतिनिधी सुकृती थापा, स्मित नाईक, सायली पाटील, हिमेश भोईर, श्रुती चव्हाण, अजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.