बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा

कृषी अधिकार्‍याचे आवाहन
। तळा । वार्ताहर ।
तालुक्यात शेती हा प्रधान व्यवसाय असून भात पिकानंतर आंबा, काजू हे कृषी उत्पन्नातीन प्रमुख फळे आहेत. राज्यातील कृषी व्यवसाय पावसाच्या लहरीपणावर अवलंबध असल्याने शेतकर्‍यांवरील आर्थिक बोजा कमी व्हावा, यासाठी फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व बागायतदारांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी केले आहे.
शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठीशासनाने हवामानातील बदलामुळे होणारे नुकसान विचारात घेऊन हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. सन 2021-22 ते 2023-24 या 3 वर्षासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक झाली आहे.कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ही योजना एच्छिक आहे. परंतु योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास कर्जदार शेतकर्‍यांना विहित मुदतीत मध्ये घोषणापत्र बँकेला सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. काजूसाठी 1 डिसेंबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अवेळी पाऊस व कमी तापमान या बाबींसाठी नुकसान भरपाई देय असणार आहे. तसेच आंबा पिकासाठी 1 डिसेंबर 2021 ते 15 मे 2022 पर्यंत अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान व वेगाचा वारा इ. बाबींसाठी भरपाई देय असणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक खाते, फळबाग उत्पादनक्षम असल्याबाबत स्वयंघोषणापत्र व फळबागेचा सशेींरस केलेला फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक, विविध कार्यकारी सोसायटी, आपले सरकार केंद्र तसेच पीक विमा पोर्टल ुुु.िाषलू.र्सेीं.ळपच्या माध्यमातून योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
आंबा पिकासाठी प्रति हेक्टर 93,800 रु. इतका विमा हप्ता असून त्यापैकी शेतकरी हिस्सा 29,400 रु. प्रति हेटर म्हणजेच 294 रु. प्रति झाड व काजू पिकासाठी एकूण विमा हप्ता 30,000 रु. प्रति हेटर इतका असून त्यापैकी शेतकरी हिस्सा 5,000 रु. प्रति हेटर म्हणजेच 25 रुपये प्रति झाडयाप्रमाणे आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासन अनुदान म्हणून विमा कंपनीस देणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्य्क, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संबंधित आस्थापनेकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version