लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये वायू गळती

एक कामगार जखमी

| महाड | वार्ताहर |

महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीत गुरुवारी (दि.22) सकाळी किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली. मात्र, वायू गळतीच्या बातमीने नागरिक भयभीत झाले होते. यातून वाचण्याच्या प्रयत्न करणारा एक कामगार किरकोळ स्वरूपात जखमी झाला. वायू गळतीने कोणाचेही नुकसान झालेले नसले तरी एक कामगार मात्र धावताना पडून जखमी झाला. कंपनी कामगारांनी ही वायू गळती अवघ्या काही मिनिटातच आटोक्यात आणली. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे कंपनीमधील बाकीचे सर्वच कामगार आपापल्या ठिकाणी पुन्हा काम करू लागले. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा घटना वारंवार घडत आहे. यामुळे कंपन्यांच्या शेजारील गावांमधील नागरिक समजलेल्या वृत्तानेच घाबरून जातात. घटनेचे वृत्त समजतात महाड तहसीलदार शितोळे, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Exit mobile version