। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. सुमारे 50 ते 55 जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे नागरिक चांगलेच संकटात सापडले होते. या संकटात आता नव्या संकटाची भर पडली. बिरवाडीजवळील ढळकाठी, खरीवली येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून वायू गळती झाल्यामुळे शेकडो नागरिकांनी वाट मिळेल तिथे पळ काढला.