महाड एमआयडीसीमध्ये वायू गळती; कामगाराचा मृत्यू

। महाड । वार्ताहर ।

कोकणात खेड लोटे एमआयडीसी पाठोपाठ आता महाड एमआयडीसीत प्रसोल कंपनीत विषारी वायू गळत झाली आहे. या विषारी वायू गळतीमुळे जितेंद्र आडे (वय ४०) रा. वालन (कॉन्ट्रेक्ट लेबर) याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर या घटनेत दोन कामगारांनाही वायू गळतीचा त्रास झाल्याने त्यांना देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कंपनीतील प्रशांत किंकले (स्टोअर इंन्चार्ज), मिलिंद मोरे (स्टोअर) हे दोन कर्मचारी अत्यवस्थ झाले होते. आता या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन आहेत. तहसीलदार सुरेश काशीद यांनी भेट दिली आहे. दरम्यान, प्रांताधिकार प्रतिमा पुदलवाड यांनी प्रशासनाल योग्य त्या सूचना दिल्या असून लक्ष ठेवून आहेत.

Exit mobile version