| रेवदंडा | वार्ताहर |
रेवदंडा शहरात ठिकठिकाणी आळी-आळीत, भरवस्तीत घराच्या बाहेर लावलेल्या मोटारसायकलमधून पेट्रोल चोरी होत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल चोरीचे प्रकार वाढत जात असल्याने रेवदंडा ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहे. सहा-सात जणांची एकत्रित अज्ञात युवकांची टोळी हा प्रकार घडवित असल्याची चर्चा आहे.
घराबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलमधून बिनधोकपणे रात्रीच्या सुमारास पेट्रोल काढले जाते. अनेक रेवदंडकर ग्रामस्थांची मोटारसायकलमधून पेट्रोल चोरीस जात असल्याची तक्रार आहे. रात्रीच्या सुमारास बाहेर ठेवलेल्या मोटारसायकलमधून पेट्रोल चोरी होत असल्याने अनेकांनी लॉक बसवून घेतले; परंतु लॉक तोडून तसेच टाकी उघडून पेट्रोल चोरी अज्ञात चोरटे करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.