| खोपोली | प्रतिनिधी |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा, पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा खालापूर येथे मंगळवारी संध्याकाळी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खालापूर तालुक्यात शिवसेनेचे निवडणून आलेले 13 सरपंच, 15 उपसरपंच व 100 च्या वर सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते, उपनेते नितीन बानगुडे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी आ. मनोहर भोईर, सुवर्णा वाळूज, नितीन सावंत, किशोर जैन, नितीन मोरे उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक एकनाथ पिंगळे यांनी केले. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी खालापूर तालुका व खोपोली शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
खालापूरात शिवसैनिकांचा मेळावा
